दारुबंदी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे नगर, पुणे जिल्ह्यातून हद्दपार

प्रांताअधिकारी संजय बागडे यांनी बजावला आदेश

शरद झावरे । पारनेर
पारनेर तालुक्यातील जवळे येथील नर्सरी व्यवसायीक दारूबंदी व शेतकरी आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते यांना शुक्रवारी पारनेर पोलिसांनी तडिपारचा आदेश बजावला असुन पुढील सहा महीने अहमदनगर व पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे .यापुर्वी पारनेर पोलिसांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पुढील कारवाईसाठी प्रांतअधिकारी यांचेकडे पाठविला होता.
तत्कालीन प्रांत अधिकारी गोविंद दाणेज यांनी तो पडताळणीसाठी उपविभागिय पोलिस अधिकारी अरूण जगताप यांचेकडे पाठविला होता. पडताळनी अहवालानंतर प्रांतअधिकारी संजय बागडे यांनी तो मंजुर करून पुढील कारवाईसाठीचा आदेश पारनेर पोलिसांना दिला आहे. घावटे यांच्यावर अॅट्रॉसिटी रस्ता अडवणे, शेतकरी आंदोलनात शेतमालाची नुकसान करणे अशा तीन गुन्ह्यांची नोंद आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात हद्दपार नोटीस बजावली. त्यावेळी परिसरातील सुमारे पंधरा गावांतील ग्रामसभांनी त्यांच्या तडीपारीच्या निषेधार्थ ठराव घेतले होते. घावटे यांनी पडताळणी वेळी आपले सविस्तर लेखी म्हणणे सादर केले होते.
रामदास घावटे यांचा शेतकरी आंदोलन, पारनेर साखर कारखाना बचाव साठी प्रयत्न, दारूबंदी चळवळ, बेकायदेशीर वाळू उपसा, पारनेर, निघोज पोलीस ठाण्यांचे बेकायदेशीर सुशोभिकरण प्रकरण लाचखोर अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला आहे. तसेच ते जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी त्याबाबतच्या काही जनहीत याचिका हायकोर्टात दाखल आहेत.

माझ्यावरील कारवाई सुड भावनेतुन – रामदास घावटे
प्रशासनातील पोलिस अधिकारी व महसुल अधिकारी यांनी संगनमताने त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून सुड भावनेतुन माझ्यावर ही कारवाई केलेली असुन या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रामदास घावटे यांनी सांगितले.

घावटेंवरील कारवाईचा निषेध
सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांच्यावरील तडीपारीची कारवाई अन्यायकारक असुन त्यांची तडीपारी स्थगिती करावी अशी मागणी लोकजागृती संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन सोमवारी पारनेर तहसिलदार यांना देणार आहोत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!