दहा कोटींची कामे रखडली

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट

अहमदनगर –  नगर सह्याद्री

नगर शहरासाठी मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना कामे अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत.

ती तात्काळ मार्गी लावावी या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील राऊत यांची भेट घेऊन केली आहे.

दरम्यान या संदर्भामध्ये उर्वरित कामांचा निधी आणण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही राठोड यांनी यावेळी सांगितले .

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!