तोफखानातील पोलिस सगळे निलंबित!

अहमदनगर | नगर सह्याद्री

पैसे घेतानाचा ‘व्हायरल व्हिडिओ’ मुळे तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काल रात्री ही कारवाई केली . सांगळे याच्याविरुद्ध यापूर्वीही निलंबनाची कारवाई झालेली आहे.

सांगळे हे वाहतूक शाखेत काम करीत असताना तो पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदर व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सिंधू यांनी दिले होते.

त्यानुसार पोलीस उपाधीक्षक यांनी चौकशी करून सिंधू यांना अहवाल सादर केला.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!