तब्बल साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत असून, त्यासाठी रविवारपासून सर्व मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तुकड्या अशा तब्बल साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान संपेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!