तंबाखू खाण्याने होवू शकतात हे गंभीर परिणाम !

निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते. त्याचा परिणाम हृदय, फुप्फुस, जठर आणि रक्तवाहिन्यांवर होतो.

रक्तवाहिन्यांवर होणा-या त्याच्या परिणामांमुळे पुढे अनेक अवयव बिघडतात. (उदा. बोटे काळी पडून झडणे.) निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते (ओठ, जीभ, गाल, श्वासनलिका) तिथे कॅन्सर होऊ शकतो.

श्वसनमार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकट संबंध आहे .धूम्रपान करणा-यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या मानाने खूपच जास्त आहे.
गरोदरपणी धूम्रपान केल्यास गर्भावर प्रतिकूल परिणाम होऊन बाळे कमी वजनाची निपजतात.
हृदयाच्या रक्तवाहिन्या निकोटीनमुळे खराब होऊन हृदयविकार बळावतो हेही सिध्द झाले आहे.
रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाबही वाढतो,श्वसनसंस्थेत कफ बळावणे, श्वासनलिका-उपनलिका अरुंद होणे वगैरे परिणाम होऊन श्वसनाचा कायमचा आजार मागे लागतो. त्यामुळे पुढे हृदयही बिघडते.तंबाखू च्या धुळीत काम करणा-या कामगारांना सतत तंबाखू छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार जडतात (व्यवसायजन्य आजार). एकाच वेळी जास्त तंबाखू – धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो.

अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ, उलटया, चक्कर इ. दुष्परिणाम दिसतात. डोळयाच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठया होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो (अशक्तपणा, स्नायू उडणे) व शेवटी मृत्यू येऊ शकतो.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!