ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

२६ जूनला होणार वितरण

पारनेर – नगर सह्याद्री – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार गांधीवादी जाहीर झाला आहे.
ही घोषणा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती, विज्ञान संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!