घरफोडी करणार्‍यास चोरास अटक

अहमदनगर / नगर सह्याद्री
राहुरीत घरफोडी करणाऱ्या नितीन सोपान पवार (वय २१, रा. पानेगाव, ता. नेवासा) यास अटक केली आहे.
त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरलेले 20 हजार रुपयांचे विविध कंपनीचे तीन मोबाईल काढून दिले आहेत. ते हस्तगत करुन आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
दि. १६ एप्रिल नामदेव कल्याण पवार यांच्या राहुरी तालुक्यातील घरी चोरी झाली होती. 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना हा गुन्हा नितीन पवार यांनी केल्याचे समजले. त्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन पवार याला अटक केली आहे.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!