घरफोडीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर: घरफोडी करणारा आरोपी नितीन सोपान पवार,(वय-21, रा. पानेगांव, ता. नेवासा) यांस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून विविध कंपनीचे तीन मोबाईल असा एकून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून त्याला नेवासा तालुक्‍यातील पानेगाव येथून ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून समजलेल्या माहिती नुसार पोलीस सोन्याबापू नानेकर, बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, मनोज गोसावी, रविंद्र कर्डीले, राम माळी, संदीप चव्हाण, विशाल दळवी, रणजित जाधव, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, जालिंदर माने, चालक सचिन कोळेकर यांच्या पथकाने सापळा रचवून नितीन पवार याला नेवासा तालुक्‍यातील पानेगांव येथून ताब्यात घेतले.
राहुरी येथील नामदेव कल्याण पवार (वय-48, रा. वाळूजपाई, ता- राहूरी) त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 73 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!