केरळमधील मुस्लीम महाविद्यालयात बुरखाबंदी

केरळ / वृत्तसंस्था


श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घातली गेली आहे. विशेष म्हणजे केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात ही बंदी घालण्यात आली आहे. हे महाविद्यालय मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवले जाते. 

श्रीलंकेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पेहरावांवर बंदी घातली. भारतात निवडणुकीच्या धामधुमीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातील संपादकीयातून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली. 

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!