कर्नाटकीय राजकारणाला नवे वळण; राजीनामे नामंजूर

बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या १३ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यामुळे कर्नाटकात सत्ताबदल घडून येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. परंतु, कर्नाटकीय राजकारणाला आणखी एक नवे वळण लागले आहे. आमदारांनी योग्य पद्धतीने आपले राजीनामे सादर केले नसल्याचे विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी सांगितले.

केआर रमेश कुमार म्हणाले कि, राजीनाम्याची एक प्रक्रिया असते. एक नियमावली असते. त्यानुसारच आम्हाला निर्णय घ्यावे लागतात. या प्रक्रियेचे आमच्या कार्यालयालाही पालन करावे लागते. यासाठी कोणतीही वेळेची निश्चित मर्यादा नसते. यातील एका नियमानुसार, जर अध्यक्षांना विश्वास असेल कि, राजीनामे कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वेच्छेने दिले आहेत. तरच ते स्वीकार केले जातील. परंतु, असे न झाल्यास काय करावे याबद्दल अधिक माहिती घेण्याची प्रक्रिया चालू आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जेडीएसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे सादर करण्याआधी मित्रपक्ष काँग्रेसच्या मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले असून आता कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारची पुनर्रचना करण्यात येणार आहे.  विधानसभा अध्यक्षांनी आमदारांचे राजीनामे मंजूर केले तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडी अल्पमतात जात असली तरी सरकारला विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!