कर्नाटकात राजकीय भूकंप! ११ आमदारांचा राजीनामा

या ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या दालनात जाऊन त्यांचे राजीनामे सादर केले. यावेळी रमेश कुमार हे त्यांच्या दालनात नव्हते. त्यांच्या सचिवाकडे हे राजीनामे देण्यात आले असून ११ आमदारांनी राजीनामे दिल्याच्या वृत्ताला रमेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, राजीनामा देण्यासाठी निघालेल्या या आमदारांनी त्यांचे मोबाइल फोन बंद ठेवल्याने काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांना या आमदारांशी संपर्क साधणं कठिण झालं आहे. त्यामुळे कर्नाटकात येत्या काही तासांत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

दरम्यान, आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि डी.के. शिवकुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. तसेच शिवकुमार यांनी कुणीही राजीनामे देऊ नये असं आवाहन आमदारांना केलं आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!