उन्हाळ्यात शिळं अन्न खाताय…? जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

उन्हाळ्यात शिळं अन्न खाणं म्हणजेच आजारांना आमंत्रण दिल्या सारखं आहे. शिळं अन्न खाल्यामुळं काय आजार होऊ शकतात यावर एक नजर…
पोट बिघडण्याच्या तक्रारींत वाढ

या दिवसांत पोट बिघडण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते. तापमानात वाढ झाल्यानं अन्नात बॅक्टेरिया पसरतात. हे बॅक्टेरिया ५ डिग्री सेल्सिअस ते ६० डिग्री सेल्सियस पर्यंतच्या वातावरणात झपाट्याने वाढतात.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण धोक्याचं

जास्तकरुन लहान मुलांना डायरियाचा त्रास होतो. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळं त्यांना शिळं अन्न देण्याचं टाळा. डायरिया झाल्यानंतर उल्टी, ताप, जुलाब होण्याची शक्यता आहे. यामुळं शरीरातील पाणी कमी होतं आणि उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण धोक्याचं ठरू शकतं.

जपून खा दूधाचे पदार्थ.
काही जणं फ्रिजमध्ये ठेवलेले ४-५ दिवसांचे दुधाचे पदार्थ वापरतात. शक्यतो या दिवसांत शिळं दूध वापरणं टाळा. तुम्ही जर पाकिटबंद दूध वापरत असाल तर त्याची एक्सपायरी डेट तपासून घ्या.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!