आरोप सिद्ध करा नाहीतर जेलमध्ये टाकू -ममता

नवी दिल्ली

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यामधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या हिंसाचारात थोर विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली होती, हि मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा – मोदींनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा जेलमध्ये टाकू, असा गर्भित इशारा दिला आहे.

कोलकातामध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. हा पुतळा भाजपच्या गुंडांनी फोडल्याचा आरोप ममता बॅनर्जी करत आहेत, तर मोदी – शहा यांनी मात्र तृणमूलच्या गुंडांनी मूर्तीची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!