आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर

 

सिंधुदुर्ग : हायवे आंदोलनात अटक करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्यासह १९ जणांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांच्यासह अटकेत असलेल्या १९ आरोपींना मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात कालच अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज सुनावणी करण्यात आली व सुनावणीमध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन देताना दर रविवारी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावावी तसेच अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशा अटी घातल्या आहेत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!