अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून साडेआठ लाख लाबवले

अहमदनगर | नगर सह्याद्री

चोरट्यांनी घरफोडीनंतर आता एटीएम मशीन ‘ टार्गेट ‘ केल्या आहेत केडगावमधील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडून सुमारे साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली तसेच गुलमोहर रोडवरील आंध्रा बँकेचे एटीएम मशीन वेल्डिंग कटरने फोडण्याचा प्रयत्न केला . मात्र येथूनचोरी होऊ शकली नाही . याबाबत माहिती अशी की , केडगाव येथे जलाराम बेकरी जवळ महामार्गावर अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन आहे . १२ मे रोजी मध्यरात्री १ . ४५ ते सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून लाख ३८ हजार रुपये लंपास केले आहेत .

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!