अपंग व्यक्ती व शाळकरी मुलींना मोफत सायकलींचे वाटप – आ.संग्राम जगताप मित्र मंडळाचा उपक्रम

अहमदनगर / नगर सह्याद्री – आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने शहरातील गरजू अपंग व्यक्ती व शाळकरी मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रा. माणिकराव विधाते, गौतम मुथा, मनीष फुलडहाळे, निलेश गाडळकर, हिम्मत मेहेरबान, पवन फिरोदिया, विकी कानडे, छोटू बोरुडे, अनिल गाडळकर, सुहास मुळे, डॉ. महेश वीर, डॉ.अमित कुलांगे, डॉ. बडवे, अरविंद डीक्कर, प्रा.सीताराम काकडे, प्रा.अरविंद शिंदे, जालिंदर बोरुडे, निहार भरणे,संतोष झावरे, अमित मुथा, दत्ता खैरे, करीम हुंडेकरी, प्रसाद बेडेकर, अभिजित खोसे, डॉ.अखिल धारूणकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले, अडचणीच्या काळात प्रत्येकाला साथ देणे हे आपले कर्तव्य आहे. समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. मोफत सायकलींच्या वाटपामुळे गरजू अपंग व्यक्ती तसेच शाळेत जाणाऱ्या मुलींची सोय होणार आहे. नगर शहरातील विविध सामाजिक संस्थांनी आणि मित्रपरिवाराने सामाजिक भावनेतून वेगवेगळे उपक्रम घेवून आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबीर, विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, अनाथांना मिष्टान्न भोजन दिले. या सर्व उपक्रमांमधून आपले सामाजिक दायित्व दाखवून दिले आहे. याबद्दल आपण सर्वांचे ऋणी आहोत, असेही आ.जगताप म्हणाले.

यावेळी गौतम मुथा म्हणाले, आ.संग्राम जगताप हे सर्व समाजाला बरोबर घेवून काम करणारे व शहराच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांचा वाढदिवस समाजासाठी उपयोगी ठरावा या साठी आम्ही सर्व मित्र मंडळाने एकत्र येवून गरजूंना सायकलींचे वाटप केले आहे. या पुढील काळातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील असे ते म्हणाले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!