पावसाळी अधिवेशन सोमवारपासून ( 17 जून) सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यानंतर ऑक्टोबरमध्ये थेट राज्यात विधानसभेचा बार उडणार आहे. त्यामुळे फडणवीस आपल्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार व फेरबदल करण्याची शक्यता आहे. लोकसभेत युतीने अभूतपूर्व यश मिळवले. त्यामुळे विस्तारात कोणा-कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बडे राजकीय घराणे असलेले मोहितेंनी भाजपात प्रवेश केला होता. तर मुलाला भाजपकडून उमेदवारी मिळवून दिल्यानंतर राधाकृष्ण विखे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी काँग्रेसमधील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, भाजपमधील जुन्या नेत्यांना विखेंच्या मंत्रिपदाला विरोध आहे.